Rama Madhavache Jithe Chitt Laage -Ganesha Prati Aarti Gauya |
रमा माधवांचे जिथे चित्त लागे - गणेशाप्रती आरती गाऊ या
रमा माधवांचे जिथे चित्त लागे
जिथे सत्य चिंतामणी नित्य जागे
तया थेऊराला चला जाऊ या
गणेशाप्रती आरती गाऊ या
तया थेऊराला चला जाऊ या
गणेशाप्रती आरती गाऊ या
जिथे मोरया मूर्ती पद्मासनात
दिसे वामशुंडा नि मुद्रा निवांत
जिथे मोरया मूर्ती पद्मासनात
दिसे वामशुंडा नि मुद्रा निवांत
असा भक्त चिंतामणी पाहू या
असा भक्त चिंतामणी पाहू या
गणेशाप्रती आरती गाऊ या
तया थेऊराला चला जाऊ या
गणेशाप्रती आरती गाऊ या
बघे देव प्राचीवरी सुर्यबिंबा~~~
तया पाहते कौतुके माय अंबा~~~
बघे देव प्राचीवरी सुर्यबिंबा~~~
तया पाहते कौतुके माय अंबा~~~
पदी पद्म त्याच्या चला वाहू या
पदी पद्म त्याच्या चला वाहू या
गणेशाप्रती आरती गाऊ या
तया थेऊराला चला जाऊ या
गणेशाप्रती आरती गाऊ या
तया थेऊराला चला जाऊ या
गणेशाप्रती आरती गाऊ या
♪ आरती गीत : रमा माधवाचे जिथे चित्त लागे (गणेशाप्रती आरती गाऊ या)
♪ गीतकार : वसंत बापट
♪ गायक : उषा मंगेशकर, लता मंगेशकर
♪ संगीतकार : यशवंत देव
♪ अल्बम : गणपती आरती अष्टविनायक गीते
♪ Rama Madhavache Jithe Chitt Laage Lyrics In Marathi
♪ Ganesha Prati Aarti Gauya Ganapati Song In Marathi
No comments:
Post a Comment